NOT RELATED WITH RAILWAY.
BUT IMP FOR TRAVELING IN DIWALI PERIOD
MSRTC to RUN 2500 extra buses
पुणे - दिवाळीमध्ये प्रवाशांच्या सोईसाठी एसटीच्या पुणे विभागामार्फत अडीच हजार जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या मार्केट यार्ड, सांगवी आणि शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांसाठी प्रवाशांना एक ऑक्टोबरपासून ऑनलाइन आरक्षण करता येणार आहे.
एसटीच्या...
more... पुणे विभागाचे नियंत्रक अशोक जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिवाळीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. याचाच गैरफायदा उठवत खासगी व्यावसायिकांकडून प्रवाशांची लूट होते. अगदी दुप्पट-तिप्पट दराने त्यांच्याकडून भाडे आकारले जाते. ही बाब लक्षात घेऊन एसटीने यंदाही जादा गाड्यांची सोय केली आहे. स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनच्या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे एसटी बसला शहराबाहेर पडण्यासाठीही खूप वेळ लागतो. ही बाब लक्षात घेता 30 ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर यादरम्यान मार्केट यार्ड, सांगवी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. येथे प्रवाशांच्या सोयीसाठी स्वागत कक्ष, पिण्याचे पाणी, फिरते शौचालय आणि तात्पुरती शेड उभारण्यात येणार आहे. अधिकृत आरक्षण केंद्रांव्यतिरिक्त शहरातील 40 एजन्सीकडेही प्रवाशांना आरक्षण करता येणार आहे. एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावरही आरक्षणाची सोय केली आहे. आरक्षणानंतर प्रवाशांना जादा गाड्या सुटणाऱ्या नवीन स्थानकांचा नकाशाही सोबत देण्यात येणार आहे.
एसटीच्या पुणे विभागाला नवीन 150 चालक आणि 100 वाहक मिळाले आहेत. दिवाळीच्या सुटीत विद्यार्थी बस बंद असतात, तसेच प्रवासी कमी असलेल्या मार्गावरील बस जादा गाड्यांच्या नियोजनासाठी वापरण्यात येत असल्याचे जाधव यांनी सांगितले.
बससेवा येथून उपलब्ध
शिवाजीनगरहून सुटणाऱ्या जादा बस : अकोला, जालना, औरंगाबाद, नाशिक, भुसावळ, लातूर, एरंडोल आणि मुक्ताईनगर.
पिंपरी-चिंचवड स्थानकावरून सुटणाऱ्या जादा बस : औरंगाबाद, भूम, भुसावळ, चाळीसगाव, चिपळूण, धुळे, चोपडा, एरंडोल, जत, कळंब, कोल्हापूर, लातूर, मलकापूर, मेहकर, मुक्ताईनगर, नाशिक, उस्मानाबाद, रावेर, सांगली, सोलापूर, तुळजापूर, येवला, उमरगा, यावल.
पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या जादा बस : दापोली, गोंदवले, मिरज, फलटण, सांगली.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरून सुटणाऱ्या जादा बस : खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील अन्य शहरे.
मार्केट यार्ड बस स्थानकावरून सुटणाऱ्या जादा बस : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर.